Homeताज्या बातम्याफीचर

एमडी ची नशा आणि नाशिक ची दुर्दशा 

व्यसन...व्यसन...आणि घातपात हा जणू आता नाशिककरांच्या पाटीलाच पुजलेला दिसतोय. कोणतेही व्यसन हे घातकच असते हे नव्याने सांगणे योग्य नाहीत.नाशिक मध्ये

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत
शहाजीबापूंसह इतर आमदारांच्या विरोधात उतरले सांगोला तालुक्यातील ४५ सरपंच
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात

व्यसन…व्यसन…आणि घातपात हा जणू आता नाशिककरांच्या पाटीलाच पुजलेला दिसतोय. कोणतेही व्यसन हे घातकच असते हे नव्याने सांगणे योग्य नाहीत.नाशिक मध्ये एमडी ची गोळी फुटली आणि अपुऱ्या मानसिकतेची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकरणे हळू हळू समोर यायला लागलीत. नाशिक चा क्राईम चा वाढता आलेख गृह  विभागाकडून जरी योग्य असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष मात्र संतुलन बिघडलेली मंडळी हैदोस घालत आहेत. आमची गुन्हेगारी आजिबात थांबायला तयार नाहीत. त्याची हीच ती मुख्य कारणे असतात. गृह विभाग प्रत्यक्ष नागरिकांना तर असे आवाहन कधीच करत नाही परंतु बेरोजगारी , गुन्हेगारी याची पार्श्वभूमी काय ? असे तपासल्यास उत्तर नक्कीच येईल की ? व्यसन !

नि संकोच पणे आजची तरुणाई ही मेडिसिन च्या माध्यमातून आपली अनैसर्गिक शरीर भूक भागवतांना दिसत आहे. त्यामुळे यामध्ये छोटे छोटे कारणे असून देखील यांची मानसिकता दैनंदिन व्यवहारात टिकत नाहीत. जोखमीची कामे यांना करता येत नाहीत. मेडिसिन च्या माध्यमातून यांची बुद्धीभ्रष्ट सदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे किंबहुना कित्येक घटना अशा घडलेल्या आढळतात तसे विविध आरोग्य संघटना वेळोवेळी समाजास जागे करत असतात. त्यात प्रसार माध्यमे देखील चांगली भूमिका बजावत असतात. अशा घटनांच्या माध्यमातून समाजास जागे करण्याचे काम करत असतात.

एमडी चा सर्वाधिक फटका हा तरुण पिढीला बसत असतो.एमडी घेणारी मंडळी यांच्या शरीरावर दूरगामी परिणाम जाणवतात.त्यांचे सामाजिक जीवन उद्वस्थ होते.

आपल्या कडे पूर्वीचे लोक म्हणत असत की काय पिसाळल्यागत करतोय. अशीच काही अवस्था आज ह्या एमडी मेडिसिन घेणाऱ्या तरुणांची झाली आहेत. जनरली आज पर्यंत ड्रग्स घेणारी यांची अवस्था काही वेगळी नसते. त्यामुळे नाशिक मध्ये आता हिंसक मानसिकतेतून , लूटमार, आकर्षण, कम काम ज्यादा दाम, अशी भावना तयार होऊन इतरांची स्पर्धा करण्याच्या नादात स्वतःच “स्वतःच आयुष्य” कस बरबाद करून घेतात त्याचे जिवंत उदाहरने सध्या नाशिक मध्ये दिसुन येत आहेत.

अशी उदाहरणे आम्ही नाशिककर कधी तरी मुंबई ,पुणे अथवा मेट्रो शहराची ऐकत वा वाचत होतो. परंतु आता तरुणाई वा महिला व्यसनाच्या आहारी गेल्याने भविष्य अवघड आहेत हेच स्पस्ट होते.

योगेश रोकडे नाशिक  ९४२२८९२१९८ 

COMMENTS