Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन

नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १९ डिसेंबर रोजी स्काऊट - गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे भव्य

जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर २०२४ ला भाजपचा पराभव होईल – अमोल मातेले 
आता मुंबई ते नवी मुंबई प्रवास वॉटर टॅक्सीने ३० मिनिटांत होणार | LOKNews24
प्रवरा कारखान्याचा तीन हजार भाव, इतरांचे मात्र तोंडावर बोट

नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. १९ डिसेंबर रोजी स्काऊट – गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ह्यामध्ये इ. ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये एकूण ४० ते ४५ स्टॉल लावण्यात आले होते . यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करून अनेक रूचकर विशिष्ट पदार्थ व काहींनी बुध्दीचे खेळ असे स्टॉल लावले होते. आनंद मेळाव्याचे उदिष्ट हे विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाचे स्वरूप कळणे व त्यांची व्यवसायाबाबतची आत्तापासूनच तोंडओळख करून देणे जेणेकरून पुढे जाऊन ते यशस्वीरीत्या काहीही गोष्टी अचूकपणे साध्य करू शकतात. कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी शालेय समितीचे रावसाहेब मोरे व काश्मिरे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व स्पर्धकांचे मनोबल वाढवले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

COMMENTS