Homeताज्या बातम्याबीड

भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण

केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये दांगट- पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेले दोन छोटे टिप्पर, पे

बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियञण कार्यक्रम वतीने घाट सावळीत जनजागृती शिबीर संपन्न.जिल्हा शल्यचिकित्सक सतिश कुमार सोळुंके यांचे अभियान.
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक



केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये दांगट- पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेले दोन छोटे टिप्पर, पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणार्‍या टँकरवर सरकी पेंडीची वाहतूक करणारा 12 टायरी ट्रक भरधाव वेगात माजलगाव कडून केज कडे येणारा ट्रक भवानी माळापासून भरधाव वेगात आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी रात्री 2-00 वाजण्याच्या दरम्यान सदरील ट्रक हा भवानी चौकातील अरुंद रस्ता असल्याने व  वेग मर्यादा जास्त असल्याने  चालकाला वळण न घेता आल्यामुळे सदरील ट्रक हा सरळ दांगट- पाटील यांच्या पेट्रोल पंपात घुसला व दोन छोटे उभे असलेले टिप्पर व डिझेल- पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर यावर  धडकून पलटी झाला. यात सदरील ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर दोन छोट्या टिप्परचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवार व शनिवार रोजी च्या मध्यरात्री 2-00 वाजण्याच्या दरम्यान सदरील घटना घडली असल्याची माहितीही प्राप्त झालेले आहे.
केज शहर हे खामगाव-पंढरपूर व अहिल्यानगर-अहमदपूर या दोन राज्य मार्गावरील शहर असून शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौक असे प्रमुख दोन चौक असल्याने या दोन्हीही चौकामध्ये वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. दोन्हीही चौक वरदळीचे ठिकाण असल्याने तेथे सातत्याने मोठ-मोठे अपघात घडत आहेत. दोन्ही चौकाचे विस्तारीकरण  झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.त्यातच  चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे खास करून धारूर-आंबेजोगाई रोडवरील भवानी चौक हा अपघाताला निमंत्रण ठरू लागला आहे. काल नुकत्याच घडलेल्या विचित्र अपघाताच्या घटनेमुळे आंबेजोगाई-धारूर रोडवरील भवानी चौक पुन्हा चर्चेत आला आहे. काल दिनांक 9 मे शुक्रवार व शनिवारच्या मध्यरात्री 2-00 सुमारास धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील मधुकर कानगे यांच्या मालकीचा अशोक लीलँड कंपनीचा 12 टायर असलेला ट्रक क्र.एम. एच.50 सी.3576 हा ट्रक  माजलगाव येथून सरकी पेंड घेऊन केज मार्गे तासगावला जात असताना धारूर रोडवरील भवानी माळ ते भवानी चौक हा रस्ता अतिशय उत्तराचा असल्याने व गाडीत प्रचंड लोड असल्याने चालकाला गाडी नियंत्रित न करता आल्याने व केज शहरातील भवानी चौक अरुंद असल्याने केज शहराकडे रस्त्यावर वळण न घेता आल्याने दांगट-पाटील यांच्या पेट्रोल पंपात घुसून पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेल्या दोन टाटा कंपनीचे छोटे टिप्पर ज्यांचा क्र.एम.एच.12 के. पी.-9168 व एम.एच.38 एक्स-3058 यांना धडक देऊन सदर ट्रक हा पलटी झाला तर  दोन्ही मिनि टिप्पर मधील एक टिप्पर हे डिझेल पेट्रोलची वाहतूक करणारे टँकर क्रमांक एम.एच.44-9303 यावर जाऊन आदळले आहे. सदरील अपघात हा रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी जीवित हानी टळली आहे. सदरील अपघातामध्ये जीवित हानी झाली नसली तरी या घटनेतील ट्रकचा चालक हा किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर या ठिकाणी होणारे वारंवार अपघात हे फक्त आणि फक्त या भवानी चौकाच्या विस्तारीकरणामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे होत असल्याची माहिती सध्या जनतेतून मिळत असून हा चौक अपघाताला निमंत्रण ठरत असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, गटनेते भाऊसाहेब गुंड हे घटनास्थळी उपस्थित राहून सदर घटनेची चौकशी केली असता उपस्थित नागरिकांनी हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्याकडे चौकाचा विस्तार कमी करण्याची मागणी लावून धरली व आजपर्यंत भवानी चौकात झालेले सर्व अपघात हे विस्तारित चौक व अरुंद रस्त्या मुळे झाले आहेत असा प्रश्न चर्चेदरम्यान  नागरिकांनी उपस्थित केला.

COMMENTS