संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे :आमदार शिरसाठ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे :आमदार शिरसाठ

औरंगाबाद/प्रतिनिधी :आयुष्यात संकटे येतात आणि जातात. मात्र संघर्ष हा कायम असतो. आयुष्याची लढाई ही अनेकानेक संकटाशी असते म्हणून संकटांचा जिकरीने आणि हि

बहिणीचे शिर घेऊन सासरच्या मंडळीना दाखवत म्हणाला ‘अखेर तिला संपवले ‘ | LOKNews24
Gangapur पत्नीने पतीच्या मैत्रिणीला धु धु धुतले. l LokNews24
आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते 12 कोटी 12 लाख 70 हजार रुपयांच्या कामांचे लोकार्पण

औरंगाबाद/प्रतिनिधी :आयुष्यात संकटे येतात आणि जातात. मात्र संघर्ष हा कायम असतो. आयुष्याची लढाई ही अनेकानेक संकटाशी असते म्हणून संकटांचा जिकरीने आणि हिमतीने सामना करून आपण यशाचे विजेते झालो पाहिजे ही खुणगाठ मनाशी बाळगून आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नाला आकार देऊन ती स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला जे कष्ट करावे लागतील ते करून, संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाठ यांनी केले. संबोधी अकादमी, संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथे शनिवारी एम.पी.एस.सी. वाढीव बॅच साठी स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर तायडे या एम.पी.एस.सी. वाढीव बॅचच्या प्रशिक्षणर्थ्यांनी केले. यावेळी चंद्रकांतजी कांबळे, सहसंचालक महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवा सेवा, विभाग पुणे. तसेच सुभाष मोळवणे माजी मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, भरतसेठ राजपूत, संबोधीचे अकादकीमचे संचालक समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांची उपस्थिती होती. यावेळी सुभाषजी मोळवणे साहेब प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, वेळ कुणासाठी थांबत नाही ज्यांना वेळेचे महत्व कळाले त्यांनी आयुष्याचे सोनं केलं याचा इतिहास साक्ष आहे, वेळ आणि प्रॉपर मार्ग हीच यशाची गुरुकिल्ली आहे, तुम्ही खुप भाग्यवान आहात की तुम्ही संबोधीचे प्रशिक्षणार्थी आहात अखंड महाराष्ट्रात संबोधी सारखी दुसरी अद्यावत संस्था नाही, संबोधीचे संचालक समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी अनंत समस्यांना सामोरे जाऊन झगडून हे शिक्षणाचं दालन तुम्हां सर्वांसाठी खुलं करून दिलं आहे याचा तुम्ही पुरेपुर फायदा घेऊन अधिकारी व्हा तुमच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आणि समाजासाठी आदर्श निर्माण करा, त्यानंतर चंद्रकांत कांबळे, महासंचालक. महाराष्ट्र राज्य क्रिडा आणि युवा सेव विभाग, पुणे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत-परिश्रम या गोष्टीला दुसरा पर्यायच नाही. समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी फार खडतर प्रवास करून हा संबोधी चा डोलारा उभा केला आहे, केवळ समाजहित म्हणूनच त्यांनी हे अद्यावत संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, तुमच्या उज्वल भवितव्यासाठी निर्माण करून विद्वान तज्ञ प्रशिक्षक, उच्च प्रतीचे दर्जेदार ग्रंथ सामग्री, अगदी पुणे-मुंबईला लाजवेल अशी अभ्यासिका या सगळ्या तुमच्या स्वाधीन केल्या आहेत या सगळ्या साधनांचा उपयोग करून आपण यशाचं शिखर नक्कीच सर कराल अशी आशा व्यक्त व्यक्त केली. तद्नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकं वितरण सोहळा हर्ष-उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी एम.पी.एस.सी.वाढीव बॅच चे सर्व प्रशिक्षणार्थी तसेच प्रा. भाग्यश्री सातदिवे (महाव्यवस्थापक), प्रा. साईनाथ बोराळकर, डॉ.प्रा. कैलास फुलउंबरकर, प्रा. संजय बिडवे, प्रा. अनिल नाईक, डॉ. प्रा. देविदास इंगळे, डॉ. प्रा.संजय खंडारे, डॉ. प्रा. कैलास भरकड, प्रा. कल्याण बोरसे, प्रा. उमेश पाटील,अर्जुन बनसोडे, पवनकुमार चव्हाण, राजेश पवार, मुकुंद अंभिरे यांची उपस्थिती होती!

…हा तर, संबोधी परिवार : हत्तीअंबीरे
संबोधी ही संकल्पना मूळात लोकाभिमुख आहे. आम्ही संबोधी अकादमीला संबोधी परिवार म्हणूनच कायम संबोधित असतो. आणि एक परिवार म्हणून फक्त शिक्षणच नव्हे तर सर्वांच्या सुख-दुःखात कायम सोबत असण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही संबोधी अकादमीचे संचालक समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी यावेळी दिली.

COMMENTS