धारूर तालुक्यातील अरणवाडी येथे शनिवारी पहाटे जंगली लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसराती

धारूर तालुक्यातील अरणवाडी येथे शनिवारी पहाटे जंगली लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरणवाडी येथील शेतकरी हनुमंत रामराव माने यांच्या शेळ्यांच्या कळपावर पहाटेच्या सुमारास जंगली लांडग्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सात शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत शेळ्यांची तपासणी केली. अरणवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, वनविभागाने जंगली प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त पशुपालकांना शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS