पुणे : पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसर्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीती

पुणे : पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसर्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई प्रदीप पांडे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मैथ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

COMMENTS