Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिस महासंचालक

मुंबई/प्रतिनिधी ः फोन टॅपिंगप्रकरणात चर्चेत आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिली महिला पोलिस महासंचालक म्हणून न

बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू
थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआय ची धाड.

मुंबई/प्रतिनिधी ः फोन टॅपिंगप्रकरणात चर्चेत आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिली महिला पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यापाठोपाठ सायबर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला.
या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणार्‍या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) याची माहिती देणारी पोस्ट केली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तत्कालीन मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आले होते.

COMMENTS