Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनू कल्याणकर खून प्रकरणाला नवे वळणगोलू मंगनाळेच्या आईसह 5 जणांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड शहरातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात तपासाला वेग येत असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी गोल

तमिळनाडूतून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक
मुंबई विमानतळावर 37 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड29 किलो सोन्यासह 24 महिलांना केली अटक
एअर इंडियाच्या वैमानिकाला अटक आणि जामीन



नांदेड शहरातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात तपासाला वेग येत असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी गोलू मंगनाळेच्या आई हिंदूताई मंगनाळे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यासह पाच जणांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची प्रगती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
6 एप्रिलच्या पहाटे नांदेड शहरात अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात यापूर्वी चंद्रविजय मंगनाळे, पियुष शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रोहित लोट यांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई करत गोलू मंगनाळेची आई इंदूताई मंगनाळे यांना अटक केली. इंदूताई मंगनाळे यांना सायंकाळी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले की, या प्रकरणातील सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे. गुन्ह्याचा कट, त्यामागील हेतू आणि आरोपींमधील संबंध स्पष्ट करण्यासाठी एकत्रित चौकशी अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर न्यायालयाने सहमती दर्शवत सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली. दरम्यान, सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी गोलू मंगनाळे याला हस्तांतरण वॉरंटद्वारे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वकिलांनी दिली. सर्व आरोपींना एकत्र बसवून चौकशी केल्यास या खून प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी इंदुताई  मंगनाळे यांना कर्करोग असल्याचा दावा करत त्यांना अटक करू नये, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत त्यांना पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणेला अधिक वेळ मिळाला असून गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत असल्याने खून प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर आणि विस्तृत स्वरूपाचे असल्याचे संकेत मिळत आहेत. या हत्येमागील नेमका हेतू, आर्थिक वा वैयक्तिक वैर, तसेच इतर संभाव्य सहभागी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. नांदेड शहरात घडलेल्या या खून प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS