Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

वकिलाच्या कारमधून 1.90 कोटीचे ‘मेफेड्रोन’ जप्त

सोलापूर : शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका वकिलाच्या कारमधून तब्बल 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’नावाचा अमली पदार्थ जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या

’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त, आरोपी अटकेत
९० किलो गांजा 17 लाखांच्या मुद्देमालासह ३ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई


सोलापूर : शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका वकिलाच्या कारमधून तब्बल 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’नावाचा अमली पदार्थ जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची अंदाजित किंमत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अन्य दोघे फरार आहेत.
या कारवाईदरम्यान एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास सुरू आहे. शहरात आतापर्यंत अमली पदार्थांविरोधातील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर गुन्हे शाखेचे पथक पहाटे गस्त घालत असताना व्हीआयपी रस्ता परिसरात एक पांढर्‍या रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारला घेराव घालून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कारमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती समोर आली. कारची झडती घेतली असता चालकाच्या आसनाजवळील कप्प्यात पांढर्‍या स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला. न्यायवैद्यक तपासणीनंतर तो अमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे वजन 950 ग्रॅम इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात रिजवान शब्बीर खान (वय 26) आणि साहिल सिकंदर पीरजादे (वय 25) यांना अटक करण्यात आली आहे. अफजल मुर्शद हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तो सध्या फरार आहे. आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिस तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हा साठा अफजल मुर्शदमार्फत कारमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमली पदार्थांसह सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार असा जवळपास 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

COMMENTS