कर्जत : तालुक्यातील आळसुंदे येथील गट क्रमांक ६०५ मधील एक हेक्टर ६० आर जमीन व्यवहार प्रकरणात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत तक्रारदार केरू यशवंत आढाव यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यवहाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात फेरफार नोंदी, खरेदीखत प्रक्रिया, संमतीपत्र तसेच काही कागदपत्रांवरील सह्यांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रे व संबंधित व्यक्ती उपस्थित नसतानाही खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. यासंदर्भात केरू आढाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संबंधित जमीन व्यवहारातील काही नोंदी व कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून येत आहे. व्यवहार प्रक्रियेदरम्यान संबंधितांची संमती, आर्थिक व्यवहार तसेच फेरफार नोंदींबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याने अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात विविध संबंधित कार्यालयांकडे लेखी निवेदने देण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या पक्षाकडून सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. संबंधित जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर व नियमानुसार झाल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी तक्रारदारांसह संबंधितांकडून करण्यात येत आहे.

कर्जत : तालुक्यातील आळसुंदे येथील गट क्रमांक ६०५ मधील एक हेक्टर ६० आर जमीन व्यवहार प्रकरणात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत तक्रारदार केरू यशवंत आढाव यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यवहाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात फेरफार नोंदी, खरेदीखत प्रक्रिया, संमतीपत्र तसेच काही कागदपत्रांवरील सह्यांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आवश्यक कागदपत्रे व संबंधित व्यक्ती उपस्थित नसतानाही खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
यासंदर्भात केरू आढाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संबंधित जमीन व्यवहारातील काही नोंदी व कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून येत आहे. व्यवहार प्रक्रियेदरम्यान संबंधितांची संमती, आर्थिक व्यवहार तसेच फेरफार नोंदींबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याने अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात विविध संबंधित कार्यालयांकडे लेखी निवेदने देण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या पक्षाकडून सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. संबंधित जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर व नियमानुसार झाल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी तक्रारदारांसह संबंधितांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS