Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावी परीक्षेत किनवटच्या ’महात्मा फुले’ आणि ’सरस्वती विद्या मंदिर’चे दैदिप्यमान यश

किनवट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश 
दादा पाटील महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
यंदाही बारावीच्या निकालात मुलींची बाजी; निकाल घसरला ; राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education

किनवट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय (गोकुंदा) आणि सरस्वती विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय या दोन्ही संस्थांनी आपला निकालाचा उत्कृष्ठ दर्जा राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी संचलित या महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.शाखानिहाय निकाल व गुणवंत विद्यार्थी: विज्ञान शाखा: एकूण 454 विद्यार्थ्यांपैकी 435 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल 96% लागला आहे. प्रथम: कु. अनुष्का संजय कावळे (84.67%) द्वितीय: विघ्नेश बालाजी पोपुलवाड (81.50%) तृतीय: कु. प्राप्ती फुलाजी भोंगाळे (80.50%) विशेष उल्लेखनीय: कु. अनुष्का कावळे आणि समीक्षा डवरे यांनी हॉर्टिकल्चर विषयात 200 पैकी 200 गुण मिळवले. कला शाखा: एकूण 242 विद्यार्थ्यांपैकी 62% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम: कु. नंदिनी संतोष बोईनवाड (89.67%) – (तालुक्यातून कला शाखेत प्रथम) द्वितीय: कु. नंदिनी संतोष कोरेवाड (86.00%) तृतीय: प्रदीप इंदल जाधव (81.00%) गुण प्राप्त केले आहे. सरस्वती विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय, किनवट सरस्वती विद्या मंदिर विद्यालयानेही उल्लेखनीय कामगिरी करत आपला निकालाचा आलेख उंचावला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 73.44% लागला आहे. शाखानिहाय निकाल व गुणवंत विद्यार्थी: विज्ञान शाखा (निकाल 96.55%): प्रथम: श्रेयस रमेश श्रीरामवार (78.67%) द्वितीय: कु. अपेक्षा गोविंद चक्करवार (75.67%) तृतीय: कु. प्राची अनिल आडे (74.50%)कला शाखा (निकाल 51.11%): प्रथम: कु. सलोनी गणेश गुंजकर (83.50%) द्वितीय: कु. श्रुतिका हनुमंत गुंजकर (79.17%) तृतीय: कु. जयश्री जनार्धन माघाडे (78.33%) व्यावसायिक अभ्यासक्रम: या शाखेचा निकाल 45% इतका लागला आहे. या घवघवीत यशाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच, सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, सचिव व मुख्याध्यापक कृष्णकुमार नेम्मानीवार, उपमुख्याध्यापक संजय चव्हाण आणि सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS