Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका सरदारजींच्या पुढाकारातून गोदावरी स्वच्छतेचा संदेश; नांदेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन

नांदेड : पवित्र गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी एका सरदारजींनी घेतलेला पुढाकार सध्या नांदेडकरांचे लक्ष वेधून घेत आहे. कोणत्याही प्

नांदेड वाघाळा महानगरपालिकेला कचरा व सांडपाणी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचे कडक निर्देश
ऑपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेती माफियावर पोलिसांचा छापा; 47.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक कुंभमेळ्याची मोठी अपडेट! ऐतिहासिक रामकुंड परिसर पुढील २ महिन्यांसाठी पूर्णपणे बंद; ‘या’ ठिकाणी होणार धार्मिक विधी!

नांदेड : पवित्र गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी एका सरदारजींनी घेतलेला पुढाकार सध्या नांदेडकरांचे लक्ष वेधून घेत आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता दररोज पहाटेच्या शांत वातावरणात शबद कीर्तन ऐकत ते गोदावरी नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा आणि घाण काढण्याचे काम अत्यंत समर्पित भावनेने करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक नागरिकांमध्येही जागृती निर्माण होत आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेड शहराची ओळख गोदावरी नदीमुळे अधिक पवित्र आणि ऐतिहासिक मानली जाते. मराठवाड्याच्या अनेक भागांना जीवनदान देणारी ही वरदायिनी नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहे. नदीपात्रात वाढणारा कचरा, प्लास्टिक आणि धार्मिक अवशेषांमुळे गोदावरीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने सुरू केलेली ही स्वच्छता मोहीम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. नांदेडकर तुम्ही आम्ही का मागे? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी आता या मोहिमेत सहभागी होण्याची गरज व्यक्त केली आहे. हजारो हात मदतीला आले, तर गोदावरी नदी पुन्हा एकदा निर्मळ आणि पवित्र स्वरूपात पाहायला मिळू शकते, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गोदावरी ही केवळ नदी नसून नांदेडच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि जीवनाची ओळख आहे. त्यामुळे नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मतही व्यक्त होत आहे. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन गोदावरी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करूया, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे.

COMMENTS