Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक कुंभमेळ्याची मोठी अपडेट! ऐतिहासिक रामकुंड परिसर पुढील २ महिन्यांसाठी पूर्णपणे बंद; ‘या’ ठिकाणी होणार धार्मिक विधी!

नाशिक : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकां

उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा नव्या जलक्रांतीची दिशा; आ. आशुतोष काळे; कुंभारी येथे गोदावरीचे जलपूजन
नांदेड वाघाळा महानगरपालिकेला कचरा व सांडपाणी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचे कडक निर्देश
Nashik Ramkund Closed: रामकुंड परिसर २ महिने बंद; अस्थि विसर्जन, पूजाविधी  कुठे होणार? NMC alternative arrangements

नाशिक : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोदावरी घाटाच्या विकासकामांसाठी ऐतिहासिक रामकुंड परिसर पुढील दोन महिन्यांसाठी म्हणजेच १६ जुलैपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेतर्फे सध्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पांतर्गत गोदाकाठाचे सुशोभीकरण आणि विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. रामकुंडावर दररोज देशभरातून हजारो भाविक अस्थि विसर्जन, पिंडदान आणि दशक्रिया विधीसाठी येत असतात. या कामांमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून नाशिक मनपा आणि पुरोहित संघाने मिळून एक विशेष पर्यायी व्यवस्था केली आहे.
नव्या नियमांनुसार, आता सर्व दशक्रिया आणि धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण तसंच भाजी पटांगण येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये पार पडतील. पिंडदान आणि पवित्र स्नानासाठी ‘गांधी तलावाची’ सोय करण्यात आली आहे, तर अस्थि विसर्जन हे नेहमीप्रमाणे मुख्य अस्थिकुंडातच करता येणार आहे.
कुंभमेळ्याच्या विकासकामांमुळे नाशिक शहरात आधीच अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता गोदाकाठावरील या नव्या निर्बंधांमुळे भाविक आणि स्थानिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पुरोहित संघाने या तात्पुरत्या व्यवस्थेला सहकार्य केले असले, तरी भविष्यात कायमस्वरूपी सुविधा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
त्यामुळे जर तुम्ही पुढील दोन महिन्यांत धार्मिक विधींसाठी नाशिकला जाण्याचा विचार करत असाल, तर ही नवीन नियमावली आणि पर्यायी जागांची माहिती नक्की लक्षात ठेवा.

COMMENTS