Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

प.बंगालमध्ये शनिवारी नव्या सरकारचा शपथविधी; हिंसाचारप्रकरणी 80 जणांना अटक, चार जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राज्यात भाजप नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी समारंभ उद्या शन

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार उफाळला शुभेंदु अधिकारी ,पीएची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या
पंतप्रधान मोदींचा हुगळी नदीत नौकाविहार
पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक ओलीस; अन्न-पाण्याविना अडकले अधिकारी; सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Violence in Bangladesh, 4 killed in shooting

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राज्यात भाजप नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी समारंभ उद्या शनिवारी 9 मे रोजी सकाळी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी दिली. त्याआधी 8 मे रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन नेतेपदावर अंतिम निर्णय होणार आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानांवरील अतिरिक्त पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे. मात्र, त्यांना पूर्वीप्रमाणे उच्च दर्जाचे सुरक्षा संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या लॉकेट चॅटर्जी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. जनतेने दिलेल्या कौलानुसार सत्तांतर निश्‍चित झाले असून, आता वास्तव स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, घटनात्मक प्रक्रियेप्रमाणे पुढील निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन भिन्न राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरात मंगळवारी रात्री जमावाने एका पक्षाचे कार्यालय उद्ध्वस्त केल्याची घटना घडली. यावेळी परिसरातील काही दुकानांचेही नुकसान झाले. तसेच, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखाली परिसरात गस्त घालणार्‍या पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

COMMENTS