Homeताज्या बातम्या

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खळबळ; नगरसेवकांचे ‘किडनॅपिंग’ करून घोडेबाजारी? अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांचा प्रस्थापितांवर गंभीर आरोप

नांदेड : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांन

सोलार कंपनीकडून लाखोंची फसवणूक; नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी
गुन्हेगारांच्या गराड्यात खाकीचा वाढदिवस! अर्धापूर पोलिसांच्या ‘बर्थडे पार्टी’चा व्हिडिओ व्हायरल, पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा वादात
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ३ लाखांच्या ५ चोरीच्या दुचाकी जप्त; मुदखेडचा आरोपी गजाआड
Prashant Ingole (@engg.prashant.ingole) • Facebook

नांदेड : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांनी प्रस्थापित उमेदवारांवर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आणि निवडणुकीतील समीकरणे बदलण्यासाठी काही नगरसेवकांना थेट ‘गायब’ (किडनॅप) करण्यात आल्याचा दावा इंगोले यांनी केला आहे.

प्रचारादरम्यान आपण आणि आपले कार्यकर्ते काही नगरसेवकांच्या घरी भेटीसाठी गेलो असता तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित नगरसेवकांचे कुटुंबीय कमालीच्या घाबरलेल्या अवस्थेत असून नगरसेवक नेमके कुठे आहेत, याची कोणतीही माहिती देण्यास ते तयार नाहीत; तसेच घरातील सदस्यांचाही त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकारामागे निवडणूक जिंकण्यासाठी सुरू असलेल्या कथित ‘घोडेबाजारी’चा आणि मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार असल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रशांत इंगोले पुढे म्हणाले की, प्रस्थापित उमेदवार लोकशाहीऐवजी पैशाचे आणि दबावाचे राजकारण करत आहेत. महायुतीसह विरोधी पक्षांचेही मतदार ‘सहलीवर’ गेले असल्यामुळे प्रत्यक्ष प्रचार आणि संपर्क यंत्रणा राबवायची कशी, असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जर नगरसेवक स्वेच्छेने गेले असतील, तर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क का नाही? या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण लवकरच निवडणूक निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे इंगोले यांनी स्पष्ट केले. या खळबळजनक आरोपांमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रस्थापित यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS