Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंडलवाडीत कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहरात प्रथमच कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या प

मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजरा
‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे राज्याची वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहरात प्रथमच कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात शहरातील कामगार व शेतकरी वर्गाचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या उपक्रमामुळे कष्टकरी वर्गाला विशेष मान्यता मिळाली असून नागरिकांनी या अभिनव संकल्पनेचे उत्स्फूर्त स्वागत केले. कामगार आणि शेतकरी हेच समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार, उपनगराध्यक्षा प्रतिनिधी शैलेश र्‍याकावार, प्रकाश पाटील अर्जुने यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कुंडलवाडी शहरात सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले असून कष्टकरी वर्गाबद्दलचा आदर अधिक बळकट झाला आहे. नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS