Nashik News : ड्रायपोर्टच्या भू-संपादन दर निश्चिती प्रक्रियेसाठी तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik News : ड्रायपोर्टच्या भू-संपादन दर निश्चिती प्रक्रियेसाठी तयारी

Nashik News /नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निफाड (Niphad) येथे प्रस्तावित मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक हब (ड्रायपोर्ट) प्रकल्पास अखेर गती मिळण्यास

वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
बीडमध्ये ‘स्वयंपाकघरातील औषधी वनस्पती’ प्रदर्शनाचे आयोजननागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-डॉ.विवेक कुलकर्णी
कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन

Nashik News /
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निफाड (Niphad) येथे प्रस्तावित मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक हब (ड्रायपोर्ट) प्रकल्पास अखेर गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा असलेल्या भू-संपादनाच्या दर निश्चिती प्रक्रियेला ७ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दर निश्चितीबाबत चर्चा झाली, मात्र यावेळी चार शेतकऱ्यांनी आपली हरकत नोंदवली आहे.

बैठकीत (Meeting) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या दरानुसार मोबदला मिळावा, अशी मागणी केली. तथापि, शासनाने रेडी रेकनर दराच्या पटीतच मोबदला देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे ४ शेतकऱ्यांनी यावर हरकत नोंदवली असून, या मुद्यावर लवकरच पुन्हा चर्चा घेतली जाईल, असे निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मगरुळे यांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्षात ८.५ किमी लांबीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी (Railroad) आवश्यक ८.५ हेक्टर जमिनीपैकी १.७५ हेक्टर क्षेत्र असलेल्या चार शेतक-यांच्या हरकतीमुळे हे प्रकरण तात्पुरते वादग्रस्त ठरले आहे. मात्र, उर्वरित भू-संपादन प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, दर निश्वितीनंतर प्रत्यक्ष अधिग्रहणास सुरुवात होणार आहे.

हा टप्पा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक ठरणार आहे. भू-संपादन प्रक्रियेतील संवाद, शेतकऱ्यांच्या (Farmer) हरकती आणि शासनाचा ठाम निर्णय हे घटक एकत्र येत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

रेल्वे कनेक्टिव्हिटीची निकड
ड्राय पोर्टसाठी १०५ एकर जमीन निसाका (निफाड साखर कारखाना) यांच्याकडून यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याबदल्यात १०८ कोटी रुपयांचा निधी जेएनपीएकडून निसाकाला देण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही, याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव हा होता.

प्रस्तावित रेल्वेमार्गाद्वारे ड्राय पोर्टला कसबे सुकेणे रेल्वे स्थानकाशी जोडले जाणार असून, तेथून थेट जेएनपीटीपर्यंत मालवाहतुकीसाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. अधिग्रहणासाठी नोटिफाईड जमिनीची प्रक्रिया सुरू गट क्रमांक ८ मधील १.७५ हेक्टर जमीन अधिग्रहणासाठी निश्चित करण्यात आली असून, ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

केंद्र शासनाचा मेगा प्रोजेक्ट असलेल्या निफाड ड्रायपोर्टला गती मिळत असल्याने समाधानी आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. या प्रकल्पावर मी केलेल्या प्रयत्नांना आता यश येत आहे. हा प्रकल्प नाशिकसाठी वरदान ठरेल. यासाठी देखील वारंवार दिल्ली येथे बैठका घेतल्या होत्या.

COMMENTS