नेकनूर : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भव्य रक्तदान शिबिराचे

नेकनूर : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास भाविक, वारकरी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
बंकटस्वामी मठाचे मठाधिपती ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार या शिबिराचे योग्य नियोजन करण्यात आले. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा सामाजिक संदेश पुढे नेत धार्मिक वातावरणात हा सेवाभावी उपक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडला. दि. 1 मे 2026 रोजी पार पडलेल्या या शिबिरात संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी जीवनदायी ठरणार असून, आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानले.

COMMENTS