अकोले : पंजाब विधानसभा सचिवालय, चंदीगड यांच्या वतीने ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदिवासी सेवक व भारत-नेपाळ मैत्री फोरमचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पंजाब राज्य विधानसभेचे अध्यक्ष सरदार कुलजित सिंग यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष सरदार जय किसान सिंग, राम लोक खयना, सचिव सुरेंद्र सिंग मोती, अध्यक्षांचे सचिव अभिषेक गिलार, जयपूर (राजस्थान) येथील अधिविष्ट ज्वेलर, भारत संस्थापक अध्यक्ष डॉ. अतुल शर्मा तसेच सचिव रेणू गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पोपेरे यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या समाजकार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे नवतरुणांना प्रेरणा व दिशा मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. समाजाप्रती त्यांच्या योगदानाची विविध स्तरांवर दखल घेतली जात आहे. डॉ.पोपेरे यांचे नवतरुणांना एक नवीन प्रेरणा व दिशा देणारे कार्य आहे. त्यांचे समाजाप्रती मोठे योगदान आहे. या कार्यक्रमाकरीता संपूर्ण देशांमधून व विविध राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. देशातील विविध राज्यांमधून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा चंदीगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सन्मानानंतर डॉ. पोपेरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अकोले : पंजाब विधानसभा सचिवालय, चंदीगड यांच्या वतीने ‘भारत विभूषण सन्मान २०२६’ सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदिवासी सेवक व भारत-नेपाळ मैत्री फोरमचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
पंजाब राज्य विधानसभेचे अध्यक्ष सरदार कुलजित सिंग यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष सरदार जय किसान सिंग, राम लोक खयना, सचिव सुरेंद्र सिंग मोती, अध्यक्षांचे सचिव अभिषेक गिलार, जयपूर (राजस्थान) येथील अधिविष्ट ज्वेलर, भारत संस्थापक अध्यक्ष डॉ. अतुल शर्मा तसेच सचिव रेणू गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पोपेरे यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या समाजकार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे नवतरुणांना प्रेरणा व दिशा मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. समाजाप्रती त्यांच्या योगदानाची विविध स्तरांवर दखल घेतली जात आहे. डॉ.पोपेरे यांचे नवतरुणांना एक नवीन प्रेरणा व दिशा देणारे कार्य आहे. त्यांचे समाजाप्रती मोठे योगदान आहे. या कार्यक्रमाकरीता संपूर्ण देशांमधून व विविध राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
देशातील विविध राज्यांमधून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा चंदीगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सन्मानानंतर डॉ. पोपेरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS