Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूरजवळ क्रेशरवर भीषण दुर्घटना; अंधारात मातीखाली दबून ऑपरेटरचा मृत्यू

माहूर : माहूर तालुक्यातील मौजे जुनापाणी परिसरात शारदा कंट्रक्शन कंपनीच्या गिट्टी क्रेशरवर निष्काळजीपणामुळे भीषण दुर्घटना घडून एका जेसीबी ऑपरेटरचा

नळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा; पालकमंत्री विखेंचे निर्देश, नियमित वेतन व सुविधा देण्याच्या सूचना ; संप मागे
पाटोदा सुविधा केंद्रात कामगारांची लूट थांबवा; दोषींवर तात्काळ कारवाई करा – सचिन बोबडे
पगाराविना विकास कसा? जेजेएम-एसबीएम कर्मचार्‍यांचा सवाल; महिनोनमहिने वेतन थकले; राज्यभर असहकार आंदोलन, धरण्याचा इशारा
Maa Sharda Stone Crusher Pvt Ltd in Bardani, Allahabad - Best Stone Crusher  Manufacturers in Allahabad - Justdial

माहूर : माहूर तालुक्यातील मौजे जुनापाणी परिसरात शारदा कंट्रक्शन कंपनीच्या गिट्टी क्रेशरवर निष्काळजीपणामुळे भीषण दुर्घटना घडून एका जेसीबी ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 2 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहूर तालुक्यात शारदा कंट्रक्शन कंपनीकडून रस्ते बांधकामासह विविध मोठी कामे सुरू आहेत. जुनापाणी जवळ उभारण्यात आलेल्या गिट्टी क्रेशरवर अनेक जेसीबी मशीन व इतर यंत्रसामुग्री कार्यरत आहेत. या ठिकाणी झारखंड राज्यातील कामगार व ऑपरेटर मोठ्या प्रमाणावर काम करत असून त्यामध्ये अजित यादव (वय 35, रा. जोंगी, ता. चंदवारा, जि. कोंढरमा, झारखंड) हे जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. गेल्या दहा दिवसांपासून क्रेशरवरील वीजपुरवठा खंडित असल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता. त्यामुळे कामगार व ऑपरेटर यांना कोणतीही सुरक्षित निवास व्यवस्था नसल्याने उघड्यावरच झोपावे लागत होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी मुरूम व माती वाहतुकीचे काम सुरू असताना अजित यादव हे मातीच्या ढिगार्‍याजवळ झोपलेले होते. रात्री उशिरा मातीने भरलेला हायवा घेऊन आलेल्या चालकाला अंधारामुळे ते दिसले नाहीत. परिणामी, चालकाने माती थेट त्या ढिगार्‍यावर टाकली. मातीचा मोठा ढिगारा त्यांच्या अंगावर पडल्याने अजित यादव हे पूर्णपणे गाडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्रीच घडली असली तरी अंधार आणि निष्काळजीपणामुळे ती लक्षात आली नाही. सकाळी कामगारांनी माती उचलण्यास सुरुवात केली असता ही घटना उघडकीस आली. सहकार्‍यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून मातीखालून मृतदेह बाहेर काढला आणि माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहाय्यक पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनीही या कार्यात सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी शवविच्छेदन केले असून पुढील तपास सुरू आहे. मृत अजित यादव यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते सर्वजण झारखंड राज्यात वास्तव्यास असून कंपनीकडून मृतदेह मूळ गावी पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, क्रेशरवर मूलभूत सुविधा नसणे, विशेषतः वीजपुरवठा खंडित असतानाही रात्री काम सुरू ठेवणे, तसेच कामगारांसाठी सुरक्षित निवास व संरक्षणाची व्यवस्था न करणे, या बाबींवरून कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

COMMENTS