Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या;भोर तालुक्यातील घटना; ग्रामस्थांचा संताप

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमु

पालघरमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; कामगाराचा मृत्यू; चार महिला गंभीर जखमी
धारूर पोलिसांची धडक कारवाई : 31 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्तइनोव्हा क्रिस्टासह मोठा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत
किनवट वन विभागाची ’सिंघम’ स्टाईल कारवाई; सागवान तस्करी करणारा पिकअपसह आरोपी जेरबंद
Bhor Pune Minor Girl Brutally Murdered After Assault; Villagers Outraged

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर एका 65 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली आपल्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. दुपारच्या सुमारास ती घरासमोर खेळत असताना गावातील आरोपीने तिला आमिष दाखवून गोठ्याकडे नेले. तेथे तिच्यावर अमानुष अत्याचार केल्यानंतर, आपला गुन्हा उघड होऊ नये या भीतीने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. यानंतर मृतदेह लपविण्यासाठी तो शेणाच्या ढिगार्‍याखाली ठेवण्यात आला. दुपारपासून मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. परिसरातील निरीक्षण कॅमेर्‍यांतील चित्रफिती तपासल्या असता आरोपी चिमुकलीला सोबत घेऊन जाताना स्पष्ट दिसून आला. या आधारावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. ही घटना समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी चिमुकलीचा मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत फाशीची शिक्षा होईपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवू : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे.

COMMENTS