Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूमध्ये दोन फटाका कारखान्यांत मोठा स्फोट

तामिळनाडू- तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाका कारखान्यामध्ये मंगळवारी स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्न

आर्थिक बचतीचा मंत्र विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी महत्वाचा ः अभय आव्हाड
60 हजार जुन्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा
Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24

तामिळनाडू- तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाका कारखान्यामध्ये मंगळवारी स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पहिला स्फोट हा विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी जवळ एका फटाका कारखान्यात झाला. सुदैवाने या कारखान्यात कोणताही जीवितहानी झाली नाही. तर याच जिल्ह्यातील कम्मापट्टी गावात एका फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवकाशीमध्ये अनेक फटाकेचे कारखाने आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र फटाक्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. कम्पापट्टी गावात एका फटाका कारखान्यात फटाके तयार केले जात होते. यावेळी अचानक स्फोट झाला, या स्फोटामध्ये 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याचं छत हवेत उडून गेलं. त्यावरून या स्फोटाची तीव्रता लक्षात येऊ शकते. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी 9 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू येथील अरियालुर फटाका कारखान्यात स्फोटो झाला होता. या स्फोटात 3 महिलांसह 11 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना वेत्रियुर मदुरा विरागुलर गावात घडली होती. या घटनेच्यानंतर कारखाना मालक मालिक राजेंद्र (65) आणि त्याचा जावई अरुण कुमार (39) याला पोलिसांनी अटक केली आहे. दिवाळीच्या तोंडावर फटाक्याचे उत्पादन जोरात सुरू आहे. या कारखाना मालकाने 30 मजुरांकडून जास्तीच्या वेळेत काम करून घेत होता. त्यावेळी या कारखान्यात स्फोट झाला

COMMENTS