Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मध्य प्रदेशातील अपघातात 16 मजूर ठार

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत

आसाममध्ये हवाई दलाचे ‘AN-32’ विमान कोसळले; लँडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू!
जुन्नरमधील अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू
पंजाबमध्ये बस अपघातात सहा जणांचा मृत्यू
मध्यप्रदेश: सारंगपुर में दो वाहनों की भिड़ंत, दो महिला की मौत... 21 घायल,16  गंभीर शाजापुर रेफर

भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चिकलिया फाटा परिसरात मजुरांना घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन अचानक अनियंत्रित झाले. वाहन उलटल्यामुळे त्याच वेळी समोरून येणार्‍या दुसर्‍या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेत अनेक जण वाहनाखाली अडकले आणि काहींना गंभीर दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी इंदूर येथे पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय पथकांकडून जखमींवर उपचार सुरू असून काहींची स्थिती अजूनही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनेची दखल घेत प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इंदूर विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना वैद्यकीय सुविधांवर स्वतः लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून, या दुर्घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS