आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी

कर्जत : प्रतिनिधी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या प्रयत्नातून कित्येक नवीन कामे मंजूर झाली

जामखेड-सौताडा 548-डी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
राष्ट्रवादीचा काँग्रेस जामखेड तालुकाध्यक्ष कोण?
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

कर्जत : प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या प्रयत्नातून कित्येक नवीन कामे मंजूर झाली असून अनेक कामे सुरू आहेत. ती दर्जेदार होत असल्याचे लोक सांगत आहेत. श्री संत सदगुरु गोदड महाराज यांची ग्रंथसंपदा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादांनी सुरू केले आहे. मात्र त्यांनी केलेला विकास हा काहींना देखवत नाही. त्याचा काहींना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे विविध प्रकारची दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत. अशी विधाने करण्यापूर्वी त्यांनी आपले जनमत, वार्डातील स्थिती तपासून घ्यावी व आपली कुवत पाहून वक्तव्य करावे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मनिषा सोनमाळी यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

 आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरीव काम उभारले जात आहे. नगर- सोलापूर महामार्गाच्या कामासाठी आ. रोहित पवार यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन हे काम सुरू आहे. आ. पवार यांच्या दूरदृष्टीतून मतदारसंघाचा वेगाने विकास होत आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील अधिकाऱ्यांचे काम उल्लेखनीय ठरत आहेत. त्याचा मतदारसंघात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

COMMENTS