मुंबई : मुंबईतील मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. त्यांनी 24 वर्षीय तरुणाला 1.15 किलो स्पर्म व्हेल अॅम्बरग्रीससह अटक केल

मुंबई : मुंबईतील मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. त्यांनी 24 वर्षीय तरुणाला 1.15 किलो स्पर्म व्हेल अॅम्बरग्रीससह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अदनान खान असे आहे. आरोपीकडे जप्त करण्यात आलेला अॅम्बरग्रीस हा आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात अत्यंत मौल्यवान मानला जातो. संशयास्पद हालचाली आढळल्याने अदनान खान याला अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आरोपीने पोलिसांशी वाद घालत एका पोलिस शिपायावर हल्ला केला.

COMMENTS