Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले कुलदैवत ज्योतिबाचे दर्शन

कोल्हापूर प्रतिनिधी - केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी आज त्यांचे कुलदैवत असलेल्या ज्

राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी;
केडगाव दुहेरी हत्याकांड; सरकारी वकिल म्हणून ‘यांची’ होणार नियुक्ती
मुंबईकरांना एप्रिलपासून मिळणार मोफत वैद्यकीय उपचार

कोल्हापूर प्रतिनिधी – केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी आज त्यांचे कुलदैवत असलेल्या ज्योतिबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांचं नाव ज्योतिरादित्य कसे पडले हे देखील सांगितले. तसेच ज्योतिबा विकास प्राधिकरणा साठी महाराष्ट्र सरकारने निधी दिले. त्यांचे आभार ही मानले. यावेळी त्यांनी भाविकांशी चर्चा करत लहान मुलांशी देखील गप्पा मारल्या. दरम्यान सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नागपंचमीच्या सणाबाबत ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पूर्वीप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून पर्यावरण  विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही सिंधिया यांनी दिली. 

COMMENTS