बीड : बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या मोईज राज यांची ‘राष्ट्रीय मानवी अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण, भारत’ या राष्ट्रीय

बीड : बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या मोईज राज यांची ‘राष्ट्रीय मानवी अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण, भारत’ या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या बीड जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात समाधान आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.
संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी मोईज राज यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मानवी हक्कांचे संरक्षण, अन्यायाविरुद्ध लढा आणि भ्रष्टाचार निर्मूलन हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असून देशभरात ती विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय कार्य करत आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मोईज राज यांनी सांगितले की, समाजातील शोषित, वंचित आणि पीडित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करणे हे आपले प्रमुख ध्येय असेल. शासकीय तसेच निमशासकीय स्तरावर होणार्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांमध्ये मानवी हक्कांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा, प्रशिक्षण शिबिरे आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन आणि बीड जिल्ह्यातील अन्यायग्रस्त नागरिकांचा आवाज बनून काम करेन, असे मोईज राज यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

COMMENTS