Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी ग्राहकांनी खरीप हंगाम बियाणांसाठी तात्काळ अर्ज सादर करावेत – अनिल बोर्डे

गेवराई : शेतकरी ग्राहकांनी शासकीय योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात मिळणार्‍या खरीप हंगाम 2026 च्या बियाणांसाठी महा डीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर

राहाता तालुक्यात पिक विमा परताव्यात दुजाभाव? मच्छिंद्र चौधरी; शिर्डी, राहाता, पुणतांबा मंडळातील शेतकरी प्रतीक्षेत
शेतकर्‍यांना वेठीस धरून कृषी विक्रेत्यांचा मनमानी बंद; नांदेड जिल्हा प्रशासनाचे दुकानदारांना कडक ताकीद व कारवाईचे संकेत
उघड्यावर मद्यपानाचा हैदोस; तरोडा परिसरात कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी
खरीप हंगाम 2026 साठी बियाण्यांवर अनुदान; शेतकऱ्यांनी 'महा DBT' वर तात्काळ  अर्ज करावा – अनिल बोर्डे – beedlive24.com

गेवराई : शेतकरी ग्राहकांनी शासकीय योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात मिळणार्‍या खरीप हंगाम 2026 च्या बियाणांसाठी महा डीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आणि बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केले आहे.
खरीप हंगाम 2026 साठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांचे प्रमाणित बियाणे सवलतीच्या दरात वितरित केले जाणार आहे. यामध्ये 10 वर्षांच्या आतील व 10 वर्षांवरील अधिसूचित वाण तसेच गळीत धान्य (तेलबिया) अभियानांतर्गत 5 वर्षांतील वाणांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड आधी अर्ज करणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार असल्याने शेतकर्‍यांनी विलंब न करता अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकर्‍यांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. वैयक्तिक शेतकर्‍यांनी ग्री ट्रॅक फार्मर आयडीच्या माध्यमातून तर शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी अधिकृत सदस्यांच्या ग्री स्टॅक फार्मर आयडीद्वारे महा डीबीटी प्रणालीवर नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया 15 मे 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी दिली आहे. या योजनेचा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल बोर्डे यांनी केले आहे.

COMMENTS