Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिके जळू लागल्याने पारनेरमध्ये शेतकरी आक्रमक खडकवाडी वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन

पारनेर : तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येवि

व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
राशीनमधील सार्वजनिक जागांची विक्री बेकायदेशीरफेरफार रद्द; विकासक, खरेदीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पारनेर : तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी खडकवाडी येथील वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने आणि लोडशेडिंगचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत. विशेषतः लागवड केलेला कांदा, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्गाने आक्रमक पवित्रा घेतला.या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन रांधवण आणि पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. मात्र, खडकवाडी वीज केंद्राकडून मिळणाऱ्या अनियमित पुरवठ्यामुळे या कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. यावेळी डॉ. नितीन रांधवण, प्रकाश राठोड यांच्यासह बाळासाहेब मुसळे, आप्पासाहेब गागरे, दिपक खामकर, ज्ञानेश्वर गागरे, पवन खामकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, जर त्वरित सुधारणा झाली नाही तर आगामी काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.पळशी-वनकुटे परिसरातील बहुतांश आदिवासी समाज शेतीवर अवलंबून आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाची समस्या यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. कष्टाने उभी केलेली पिके डोळ्यादेखत जळताना पाहणे वेदनादायक आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करून वीज समस्या सोडवावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही वीज केंद्रावर कायमस्वरूपी ठिय्या मांडू असा इशारा सरपंच प्रकाश राठोड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन रांधवन यांनी दिला.

COMMENTS