बुलेट शोकिणांनो सावध व्हा किमती वाढू लागल्यात

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

बुलेट शोकिणांनो सावध व्हा किमती वाढू लागल्यात

Royal Enfield कंपनीने मोटारसायकलच्या किंमतीत वाढ केल्यामुळे ग्राहकांना जोरदार झटका बसला आहे. या कंपनीने जुलै महिन्यात वाढ केल्यानंतर लगचेच काही महिन

रोहित्र बंद विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; घेराव नंतर वीज कनेक्शन सुरू
प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ. सविता मेनकुदळे सन्मानीत
Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.

Royal Enfield कंपनीने मोटारसायकलच्या किंमतीत वाढ केल्यामुळे ग्राहकांना जोरदार झटका बसला आहे. या कंपनीने जुलै महिन्यात वाढ केल्यानंतर लगचेच काही महिन्यानंतर मोटार सायकलच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे.

जानेवारी, एप्रिल आणि जुलैमध्ये रेट्रो-मॉडर्न बाईक निर्माता Royal Enfield ने मोटार सायकलच्या किंमतीत वाढ केली होती. आज Royal Enfield ने काही मोटारसायकलच्या किंमतीत वाढ केली आहे. Royal Enfield च्या Meteor 350 च्या किंमतीत 7000 रूपये तर एनफील्ड हिमालयन एडीव्हीच्या किंमतीत 5000 रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे Meteor 350 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 99 हजार 109 रूपये तर हिमालयन एडीव्हीची किंमत 2 लाख 10 हजार 784 रूपये इतकी झाली आहे.

Royal Enfield च्या Meteor 350 च्या मालिकेमधील बेस फायरबॉलची किंमत 1.99 लाख आहेत. तर मिड स्टेलर मोटार सायकलची सध्या किंमत 2.05 लाख तर सुपरनोव्हा 2.15 लाख किंमत आहे. तर हिमालयन मालिकेतील सिल्वर, ग्रे ची किंमत 2.10 लाख, तर ब्लू रेड ची किंमत 2.14 लाख आणि ब्लॅक ग्रीन मधील 2.18 लाख इतकी किंमत झाली आहे.

दरम्यान, नवीन Royal Enfield मधील Meteor 350 मध्ये कंपनीने 349 सीसी इंजीन एअर-ऑइल, कुल्ड एसओएचसी इंजिन दिलं आहे. हे इंजिन 6 हजार 100 आरपीेएमवर 20.2 बीेएचपी पॉवर आणि 4 हजार आरपीएमवर 27 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स आहेत. हिमालयन मध्ये 444 सीसी एअर कुल्ड इंजिन आणि हे इंजिन 6 हजार 500 आरपीएमवर 24.3 बीएचपी पॉवर तर 4 हजार 32 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.

COMMENTS