Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध; काँग्रेसचा महिलांच्या हक्कांवर राजकीय घाला – शंकर देशमुख

कडा : देशाच्या राजकीय इतिहासात महिलांना समान प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाला काँग्रेससह

धानोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत मारली बाजी
पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना
‘शताब्दी दीपस्तंभ’ राज्यस्तरीय पुरस्काराने अमोलक संस्था सन्मानित;सरपंच परिषदेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कडा : देशाच्या राजकीय इतिहासात महिलांना समान प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी दर्शविलेला विरोध हा केवळ राजकीय दुटप्पीपणा नसून देशातील सुमारे 70 कोटी महिलांच्या हक्कांवर घाला असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या निर्णायक टप्प्यावर विरोधकांनी अडथळे निर्माण करून आपली महिलाविरोधी मानसिकता उघड केल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात समान संधी मिळावी यासाठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत. नारीशक्ती वंदन अधिनियम हा महिलांना सत्तेच्या केंद्रस्थानी नेणारा क्रांतिकारी निर्णय असून, यामुळे लोकशाही व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडणार आहे. मात्र, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या विधेयकाला विरोध केला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या या निर्णयाला विरोध करणे म्हणजे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘उज्ज्वला योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात मोठा बदल झाला आहे. राज्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्यात आली असल्याचे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करून निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान देण्यात आले. मनीषा म्हैसकर, सुजाता सौनिक, रश्मि शुक्ला, अश्विनी भिडे यांसारख्या वरिष्ठ महिला अधिकार्‍यांना जबाबदार्‍या देत प्रशासनात महिलांचे नेतृत्व सक्षम करण्याचा प्रयत्न झाला आहे. देशमुख म्हणाले, महिलांना केवळ घोषणांमध्ये नव्हे तर प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र विरोधकांना महिलांचे सशक्तीकरण नको असून त्यांना केवळ मतांसाठी महिलांचा वापर करायचा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने विरोधी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करण्यात येत असून, आगामी काळात महिलांच्या सन्मान आणि हक्कांसाठी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

COMMENTS