Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मणिपूरमध्ये आंदोलक-सुरक्षा दलांमध्ये संघर्ष; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, 21 जण अटकेत

इंफाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री राज्यातील विविध भागांत निदर्शने तीव्र झाली आणि काही ठिकाणी आंदोलक व सुरक्

डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
पुण्यात चक्क बस चोरून सुसाट पळवली
मणिपूर पुन्हा पेटले - पुरोगामी विचाराचे एकमत

इंफाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री राज्यातील विविध भागांत निदर्शने तीव्र झाली आणि काही ठिकाणी आंदोलक व सुरक्षा दलांमध्ये संघर्ष उफाळून आला. मशाल मिरवणुका थांबवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली. जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या तसेच धूर निर्माण करणारी साधने वापरावी लागली.
इंफाळ पूर्वमधील कोइरेंगेई, इंफाळ पश्‍चिममधील उरिपोक आणि काकचिंग जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. विशेषतः महिलांनी मशाली हातात घेऊन निदर्शने केली. काकचिंगमध्ये मिरवणूक परत येत असताना पुलाजवळ पोलिसांनी अडथळा उभारल्याने आंदोलक आणि सुरक्षा दल आमनेसामने आले. त्यानंतर दगडफेक सुरू झाली आणि तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच सुरक्षा दलांनी अश्रुधूर फोडून जमाव पांगवला. या चकमकीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सहा एप्रिल रोजी ट्रोंगलाओबी आवांग लेइकाई परिसरातील एका घरावर झालेल्या स्फोटात दोन बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. वाढत्या तणावामुळे विशेष द्रुत प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. इंफाळ पश्‍चिमचे पोलिस अधीक्षक शिवकांत सिंह यांनी सांगितले की, काही समाजकंटक निदर्शनांचा फायदा घेऊन सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये दगड, लोखंडी वस्तू, गोफणी आणि ज्वलनशील द्रव्यांचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. काही जण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेतही आढळल्याचा आरोप त्यांनी केला असून अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

सगोलबंद हिंसाचार प्रकरण
18 एप्रिल रोजी पातसोई ते सगोलबंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. या घटनेत जमावाने दगडफेक आणि ज्वलनशील वस्तूंचा वापर केला होता. त्यामुळे सुरक्षा दलातील अनेक जवान जखमी झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 232 व्या तुकडीतील तीन जवान गंभीर जखमी झाले असून शासकीय वाहनांचेही नुकसान झाले.

COMMENTS