Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगरमध्ये चड्डी-बनियान गँगचा धुमाकूळ

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे. आकाशवाणी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्वयंचलित

प्रतापगडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या
कर्जतमध्ये अनैतिक संबंधातून खून?मुलीला संशय ; चौकशीची मागणी, ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा
नांदेड शहरात 24 तासात दुसरा खून
Caddhi Baniyan Gang : सटाण्यात 'चड्डी बनियान गँग' सक्रिय

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा धाडसी चोरीच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली आहे. आकाशवाणी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्वयंचलित पैसे वितरण केंद्रावर मध्यरात्री झालेल्या हल्ल्याने शहरातील सुरक्षेच्या प्रश्‍नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती अशी की एका अज्ञात चोरट्याने केंद्रात शिरून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. निरीक्षणासाठी लावलेल्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, संबंधित व्यक्ती अत्यंत कमी कपड्यांमध्ये होती. त्याने लोखंडी अवजारांच्या साहाय्याने यंत्राचे बाह्य आवरण उघडण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात नुकसान करण्यात तो यशस्वी झाला; मात्र आतील तिजोरीपर्यंत पोहोचणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. काही वेळ झटापट करूनही यंत्र पूर्णपणे उघडता येत नसल्याचे लक्षात येताच आणि सतर्कता यंत्रणा सक्रिय होण्याची शक्यता जाणवताच, चोरट्याने तेथून पळ काढला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चोरट्याची वेशभूषा. अत्यल्प कपडे परिधान करून चोरी करण्याची पद्धत यापूर्वी काही टोळ्यांकडून वापरली गेल्याची नोंद आहे. शरीराला तेल लावून निसटण्याची सोय करून, पकड टाळण्याचा हा प्रकार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

COMMENTS