Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला

पुणे, मुंबईसह अनेक शाखांतील रक्कम लंपास

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यासारख्या शहरात ऑनलाईन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच, शुक्रवारी पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला करण

बारामतीजवळ शिकाऊ विमान कोसळले
सर्वसामान्यांचा पैसा लुटणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणा !
काँगे्रसचा 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा जाहीरनामा

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यासारख्या शहरात ऑनलाईन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच, शुक्रवारी पुण्यातील भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पुणे, मुंबईसह अनेक शाखांतील रक्कम लंपास केल्याचे या हल्ल्यानंतर समोर आले आहे.
या सायबर हल्लेखोरांनी खातेदारांच्या डेबिट कार्डचे क्लोन तयार करून पुण्यासह, मुंबई आणि दिल्लीतील खतेदारकांच्या खात्यातून तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळलेलया माहितीनुसार सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा वापर करत ही मोठी रक्कम काढली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय 62) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा ही सदाशिव पेठेत आहे. ही बँक पुण्यातील मोठी सहकारी आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर 2020 ते 2021 या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करुन पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून तब्बल 1 कोटी आठ लाख 15 हजार 700 रुपये लंपास केले. ही बाब बँकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांनात धाव घेतली. चोरट्यांनी तब्बल 439 बनावट डेबिट कार्ड तयार करत ही मोठी चोरी केली आहे.

रक्कम वळवली चीनच्या बँकेत – सायबर हल्लेखोरांनी भारती सहकारी बँकेतील 1 हजार 247 व्यवहार करत 1 कोटी 8 लाख रुपयांची रक्कम लंपास केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती. ही रक्कम चीनच्या बँकेत वळवण्यात आली होती.

COMMENTS