Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरांगे यांनी मुख्यमंत्र्यावर विश्‍वास ठेवावा; देवेंद्र फडणवीस

मुंबई / प्रतिनिधी : सरकारला 40 दिवस मुदत देऊन देखील मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

बा विठ्ठला ! राज्यातील जनतेला सुखी ठेव
स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्षाची होणार स्थापना
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

मुंबई / प्रतिनिधी : सरकारला 40 दिवस मुदत देऊन देखील मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहीजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगे यांच्या सोबत्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहीजे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास ठेवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांच्या उपोषणाच्या आज पाचवा दिवस आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त दोनदा पाणी प्यायले आहे. त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर रोज सकाळ-संध्याकाळ येतात. मात्र त्यांना तपासणी न करताच परतावे लागते. मनोज जरांगे यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजपासून प्रत्येक गावात सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत मराठा समाजाने स्थानिक पोलिसांना अर्ज द्यावा आणि तुमच्या गावात आमरण उपोषण सुरू असल्याची माहिती द्या. या उपोषणामुळे कोणाची प्रकृती बिघडली तर त्याला सरकार जबाबदार असेल. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात गेल्या 4 दिवसात 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. तुम्हाला आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, अशी विनंती मनोज जरंगे यांनी सर्व समाजातील लोकांना पुन्हा केली आहे.

COMMENTS