कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी आजरा शहरात जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी आजरा शहरात जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील वाणी गल्ली परिसरात जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. संबंधित घराची भिंत यंत्राच्या साहाय्याने पाडली जात असताना अचानक मोठा भाग रस्त्याकडे कोसळला. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या दोघी या ढिगार्याखाली सापडल्या.
या अपघातात वैष्णवी तुकाराम भोसले (14) आणि ज्योती नितीन कुंभार (45) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ललिता भोसले यांना तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेनंतर पाडकामावेळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रहदारी असलेल्या भागात अशा प्रकारचे काम करताना अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. एकाच वेळी प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.

COMMENTS