Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर; राजकुमार बाविस्कर यांची तालुकाध्यक्षपदी निवड

किनवट : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या किनवट तालुका शाखेची नूतन त्रैवार्षिक कार्यकारिणी नुकतीच गट साधन केंद्र, पंचायत समिती किनवट येथे

मोईज राज यांची बीड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती; सामाजिक क्षेत्रात अभिनंदनाचा वर्षाव
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार

किनवट : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या किनवट तालुका शाखेची नूतन त्रैवार्षिक कार्यकारिणी नुकतीच गट साधन केंद्र, पंचायत समिती किनवट येथे मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आली. संघाचे राज्याचे नेतृत्व संभाजीराव थोरात (तात्यासाहेब) आणि राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेत राजकुमार बाविस्कर यांची किनवट तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक नेते बाबुराव फसमले यांनी केले, तर अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी भूषवले. यावेळी राज्य संघटक पाराजी पोले, गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, विभागीय उपाध्यक्ष संतोष बारूळकर आणि जिल्हा मुख्य सल्लागार भगवान गजभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीमध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्ष: राजकुमार बाविस्कर, तालुका सरचिटणीस: जगदीश कोमरवार, तालुका कार्याध्यक्ष: दत्ता मुंडे, तालुका कोषाध्यक्ष: सुदर्शन येरावार, तालुका शिक्षक नेते: उदयकुमार केंद्रे, तालुका उपनेते: विष्णू कराड, जिल्हा पदाधिकारी म्हणून शंकर मुसने (जिल्हा उपाध्यक्ष), गोपाळ कणाके (जिल्हा उपाध्यक्ष), मारोती मडावी (जिल्हा उपाध्यक्ष), बालासाहेब तिडके (जिल्हा सल्लागार) आणि रामेश्वर आत्राम (जिल्हा संघटक) पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त तालुका प्रवक्ते म्हणून रमेश राठोड व पांडुरंग खरोडे, तर संपर्कप्रमुख म्हणून नितीन सावरगावे आणि ज्ञानेश्वर बोरुले यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी आपल्या भाषणात किनवट व माहूर तालुका ’दत्तक’ घेत असल्याचे घोषित करून तालुका कार्यकारिणीला बळ दिले. गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनीही शिक्षण विभागामार्फत शिक्षक संघाच्या मागण्यांना सदैव सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहूर तालुका सरचिटणीस परमेश्वर कुसुमवाड यांनी केले, तर आभार स्वानंद धपके यांनी मानले. या निवडीबद्दल तालुक्यातील शिक्षक वर्गातून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS