तुमच्याकडेही ३, ४ किंवा त्यापेक्षा जास्त बँकांची खाती आहेत का? अनेक खाती असणं तुम्हाला स्टेटस वाटत असेल, पण सावधान! हीच खाती तुमच्या कष्टाच्या पै

तुमच्याकडेही ३, ४ किंवा त्यापेक्षा जास्त बँकांची खाती आहेत का? अनेक खाती असणं तुम्हाला स्टेटस वाटत असेल, पण सावधान! हीच खाती तुमच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारू शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, खाते उघडण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवी तितकी खाती उघडू शकता. पण, जेव्हा केवायसीची वेळ येते, तेव्हा बँकेला उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागतो.
खरी मेख इथेच आहे! प्रत्येक खासगी बँकेत १० ते २५ हजार रुपये ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवावा लागतो. जर तुमच्याकडे ५ खाती असतील, तर तुमचे १ लाख रुपये फक्त अटी पूर्ण करण्यात अडकून पडतात. बॅलन्स कमी झाला की बँका हजारो रुपयांचा दंड वसूल करतात. एवढंच नाही, तर वार्षिक मेंटेनन्स, एसएमएस अलर्ट आणि एटीएम चार्जेस मिळून वर्षाला तुमचे ४ हजार रुपये वाया जातात. शिवाय, अनेक पासवर्ड्स लक्षात ठेवताना सुरक्षा धोक्यात येते आणि सायबर गुन्हेगार अशाच कमी व्यवहारांच्या खात्यांवर नजर ठेवून असतात.
त्यामुळे गरज असेल तितकीच खाती ठेवा आणि अनावश्यक खाती बंद करा. तुमचा पैसा दंड भरण्यात घालवू नका, तर योग्य ठिकाणी गुंतवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा!

COMMENTS