Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सावधान! अनेक बँकांमध्ये खाती आहेत? मग ‘हे’ ५ धोके नक्की जाणून घ्या; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

https://www.youtube.com/watch?v=D4Xr_RD3KWE शंभर दिवसांचा प्रवास… शंभर कॅमेऱ्यांची नजर… आणि अखेर ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, तो

सावधान! अनेक बँकांमध्ये खाती आहेत? मग ‘हे’ ५ धोके नक्की जाणून घ्या; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!
कच्च्या तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या
सोने-चांदी आयातीची 15 बँकांना केंद्राची परवानगी

शंभर दिवसांचा प्रवास… शंभर कॅमेऱ्यांची नजर… आणि अखेर ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, तो क्षण आला! ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ला आपली महाविजेती मिळाली आहे. अटीतटीच्या सामन्यात बाजी मारत तन्वी कोलतेने मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात तन्वीला विजेतेपदाने गौरवण्यात आलं. तिला कलर्स मराठीकडून १५ लाख रुपये, पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाखांचं वाऊचर आणि रेवा डायमंडची ज्वेलरी मिळाली. इतकंच नाही तर, तुनवाल ई-मोटर्सची ‘ई-बाइक’ आणि रितेश देशमुख यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विजेतेपद मिळाल्यानंतर तन्वी भावूक झाली. ती म्हणाली, “मी घरात आले तेव्हा विचारलं जायचं काय काम केलंय? पण मी ठरवलं होतं, बाहेर पडताना माझं नाव सगळ्यांच्या तोंडी असेल. आज मी फक्त तन्वी कोलते म्हणून नाही, तर एक ‘ब्रॅण्ड’ बनून बाहेर पडत आहे!”
१७ सदस्य आणि १०० दिवसांचा हा प्रवास वादावाद, मैत्री आणि नात्यांच्या रंगांनी भरलेला होता. पण प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत तन्वीने हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
तन्वीच्या या विजयाने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुम्हाला तन्वीचा खेळ कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा.

COMMENTS