Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जखमी ; घरासह लाखोंचे नुकसान

नागपूर : जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू, तर सुमारे दहा जण जखमी झाल्य

पुण्यातील केमिकल कंपनीत भीषण गॅस गळती; २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास, अग्निशमन दलाचे जवानही बाधित!
उत्तरप्रदेशातील अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
कामठीत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू,अनेकजण जखमी

नागपूर : जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू, तर सुमारे दहा जण जखमी झाल्याची घटना घडली. अतुल उर्फ बंटी पानतावणे (वय ४०) असे मृताचे नाव आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानतावणे कुटुंबीय सकाळच्या सुमारास घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळती झाली. त्यातून प्रथम आग लागली आणि काही क्षणांतच सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर आग संपूर्ण घरात पसरली.
प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता ही घटना घडली. आग लागल्यानंतर त्यांनी व मुलांनी तात्काळ घराबाहेर पडण्यात यश मिळवले. मात्र अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकून पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, दूरदर्शन संच, फ्रिज, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आग विझवण्याच्या प्रयत्नात विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

COMMENTS