श्रीरामपूर : साहित्य ही जीवननिष्ठा मानून राज्यभरातील काही साहित्यिकांना श्रीसंत गोरा कुंभार व वाचन संस्कृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले,

श्रीरामपूर : साहित्य ही जीवननिष्ठा मानून राज्यभरातील काही साहित्यिकांना श्रीसंत गोरा कुंभार व वाचन संस्कृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले, ते निरपेक्ष भक्ती,वाचन, लेखन कार्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील असे मत श्रीसंत ज्ञानेश्वर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष हभप डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जवळील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथे श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान व वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात हभप कोळपकर महाराज बोलत होते.प्रारंभी श्रीसंत गोरा कुंभार यांच्या 709 व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात करून अभिवादन करण्यात आले. प्रा. विलासराव तुळे यांनी संत गोरोबा कविता सादर केली तर इयत्ता पाचवीतील निर्मिक गणेशानंद उपाध्ये याने श्रीसंत गोरा कुंभारविषयी भाषण केले. स्वागत, प्रास्ताविक करून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपक्रम समिती अध्यक्षा प्रा. सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर उपाध्यक्ष नितीन प्रभाकर जोर्वेकर, कार्याध्यक्षा सौ. श्रद्धा चेतन तुळे यांनी अनुमोदन दिले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी टी.ई. शेळके, माळेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय परभतदादा पा. औताडे, साहित्यिक सुखदेव सुकळे, हभप अशोकराव शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हभप भागवतराव पा.मुठे प्रा. एकनाथ औटी, आंतरभारती श्रीरामपूर शाखा अध्यक्ष प्राचार्य सुभाष लिंगायत, कुंभार समाजाचे नेते किसनदेव भागवत, ज्ञानेश्वर दुधाळे, माजी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, केंद्रप्रमुख किशोर गाढेगुरुजी, फकिरा वाघमारे, राजाराम वने,श्रीमती सुमन बाई मांढरे,सौ. सुनंदा वाघमारे,सौ. सुनीताताई पटारे, आसरा प्रकाशनच्या सौ. मोहिनी । शिवाजी काळे, सौ छायाताई सोनवणे,सौ. प्रमिलाताई वाबळे, धोबी, परिट समाज संगमनेर तालुकाध्यक्ष भारत गवळी, लहानू रहाणेसर, सौ. कुंदा तुळे, सौ. माधुरी जोर्वेकर, सौ. वैशाली गाढे, प्रा. शिवाजीराव बारगळ, डॉ. रामकृष्ण जगताप आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे, माजी मुख्याध्यापक द सा. रसाळगुरुजी, शंकरराव जोर्वेकर यांना श्रीसंत गोरा कुंभार सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर पत्रकार, अॅङ् बाळासाहेब तनपुरे, माजी मुख्याध्यापक, अॅड. हरिश्चंद्र नाईक, वनिता राजाराम वने/ शेटे, कवी, प्रा. पोपटराव पटारे, संतोष लेंभे, बाळासाहेब देशमुख यांना वाचन संस्कृती सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, सर्व पुरस्कारार्थिंनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे, कवयित्री संगीता फासाटे यांनी काम पाहिले. वनिता वने, राजाराम वने, रसाळगुरूजीतर्फे डॉ. उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे यांचा सत्कार करण्यात आला.सौ. मंदाकिनी उपाध्ये, चेतन तुळे, ताराताई सैंदोरे, सौ. जयश्री जोर्वेकर, कृष्णा सैंदोरे, आराध्या सैंदोरे, सौ. रूपाली मोरे, सौ मनिषा वाघमारे, सौ. विद्या वाघमारे, सविता जपे, ज्योन्सा राऊत, शालिनी निघुते,सुमन केदार, वैष्णवी जगदाळे, सिध्दी बोरुडे, प्रथमेश जोर्वेकर, आदिंनी नियोजनात भाग घेतला. प्रा. विलासराव तुळे व प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सूत्रचालन केले तर संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप यांनी आभार मानले.

COMMENTS