Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत

 जामखेड : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संभाजी ब्रिगेड जामखेड व महात्मा जोतीर

धारणगाव-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा; राष्ट्रवादीची मागणी; नगरसेवक अत्तार यांचा आंदोलनाचा इशारा
निवृत्तांच्या प्रश्नांसाठी संघटीत होणे गरजेचे : पोकळे; राहाता येथे कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात
समर कॅम्पमुळे मुलं तणावमुक्त होतात : अध्यक्ष अनंत ढोले ढोले

 जामखेड : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संभाजी ब्रिगेड जामखेड व महात्मा जोतीराव फुले विचार मंच यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर पाणपोई सुरू करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १४) हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना ऍड. अरुण जाधव यांनी संभाजी ब्रिगेड ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत नेहमीच अग्रभागी राहिली असल्याचे सांगितले. तर अण्णासाहेब सावंत यांनी “पाणपोई हे केवळ पुण्यकर्म नसून ही एक महत्त्वाची आरोग्य सुविधा आहे,” असे मत व्यक्त केले.
सध्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, विविध कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भासत आहे. सर्वसामान्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेणे शक्य नसल्याने त्यांच्या आरोग्याचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
तहसील कार्यालय परिसरात तहसील, पोलिस ठाणे, नोंदणी कार्यालय, शाळा व महाविद्यालये असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची कुचंबना होत होती. ही गरज लक्षात घेऊन पाणपोई सुरू करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ऍड. अरुण जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शिवसेना युवा तालुकाध्यक्ष प्रविण बोलभाट व ओबीसी सेल अध्यक्ष विष्णुपंत गंभीरे यांच्या हस्ते झाले.
 कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड बीड जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत कान्हेरे, तालुकाध्यक्ष राजू काटकर, सामाजिक कार्यकर्ते बिलाल शेख, पत्रकार यासीन शेख, मिठुलाल नवलाखा, वाल्मीक रेडे, सुमंत रेडे, भारत रेडे, अक्षय पोकळे, संभाजी जाधव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.  

COMMENTS