Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

पुणे ः पुणे शहरात पाण्याच्या टँकरमध्ये एका बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील फुरसुंगी भागात पॉवर हाऊसजवळ टँकरने पाणी

लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
भरधाव कारची बाइकला धडक जखमी तरुणाला 3 किमीपर्यंत फरफटत नेले

पुणे ः पुणे शहरात पाण्याच्या टँकरमध्ये एका बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील फुरसुंगी भागात पॉवर हाऊसजवळ टँकरने पाणी पोहचविणार्‍या एका टँकरमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय-25, राहणार हांडेवाडी, पुणे) असे मृतदेह मिळालेल्या माहिलेचे नाव असून ती बेपत्ता असल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल आहे. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात टँकर चालक पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (रा. हांडेवाडी, पुणे) यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कौशल्या चव्हाण व तक्रारदार पुरुषोत्तम ससाणे हे हांडेवाडी परिसरात दुगड चाळ याठिकाणी रहाण्यास आहे. बुधवारी दिवसभर शहराच्या विविध भागात ससाणे यांनी टँकरने पाणीपुरवठा केला होता. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले होते व घराजवळ त्यांनी टँकर लावला होता. गुरुवारी सकाळी (एमएच 12 डब्ल्यू जे 1091 ) हा टँकर त्यांनी बाहेर काढून रामटेकडी येथे टँकर मध्ये पाणी देखील भरले. टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पोचविण्यास गेले. त्यांनी पाणी टँकर मधून सुरु केले परंतु टँकर मधून पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पाण्याचा व्हॉलव्ह तपासून पाईप बाहेर काढून पाहिला असता त्यांना टँकर मधून साडी बाहेर आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी साडी नेमकी कोठुन टँकर मध्ये आली हे पाहण्यासाठी टँकरचे झाकण उघडून आत डोकावून पाहिले असता त्यांना टँकर मध्ये कौशल्या चव्हाण हिचा मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ, हडपसर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह पाण्याचे टँकर धून बाहेर काढून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. नेमका कोणत्या कारणास्तव हा प्रकार झाला याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याबाबत आत्ताच सांगता येणार नाही अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष मांढरे यांनी दिली आहे.

COMMENTS