नाशिक ः जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम

नाशिक ः जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणार्या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातप्रकरणी ट्रकचालक अशोक काळे (रा. जुन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS