Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन

शेवगाव : शहरात महिलांना लक्ष्य करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्याच्या प्रयत्नांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांत भर बाजारपेठ, खंडोबा नगर, शिवाजी चौक, ब्राह्मण गल्ली तसेच श्रीराम कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्ती महिलांना धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांत आरोपींनी चाकूचा धाक दाखवत महिलांचा पाठलाग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशा घटना घडत असताना पोलिसांनी अधिक सतर्क राहून गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. महिलांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने भविष्यात गंभीर घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी संबंधित भागात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करणे, शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटविणे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करणे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत संबंधित भागात अतिरिक्त गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी डॉ. नीरज लांडे, दत्तात्रय फुंदे, उज्वल धूत, हरीश शिंदे, सागर शिनगारे, रेशमा शेळके, विजय काथवटे आदी उपस्थित होते. 

मोहटादेवी देवस्थान येथे ‘निधी आपके निकट’ शिबीर उत्साहात
राहुरी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. तोडमल 
नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅण्डल मार्च

शेवगाव : शहरात महिलांना लक्ष्य करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्याच्या प्रयत्नांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांत भर बाजारपेठ, खंडोबा नगर, शिवाजी चौक, ब्राह्मण गल्ली तसेच श्रीराम कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्ती महिलांना धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांत आरोपींनी चाकूचा धाक दाखवत महिलांचा पाठलाग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात अशा घटना घडत असताना पोलिसांनी अधिक सतर्क राहून गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. महिलांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने भविष्यात गंभीर घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी संबंधित भागात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करणे, शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटविणे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करणे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत संबंधित भागात अतिरिक्त गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी डॉ. नीरज लांडे, दत्तात्रय फुंदे, उज्वल धूत, हरीश शिंदे, सागर शिनगारे, रेशमा शेळके, विजय काथवटे आदी उपस्थित होते. 

COMMENTS