Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळगाव शाळेला नवे वर्ग; वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २४ लाखांची मंजुरी

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासाला गती मिळाली असून, दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी तब्बल २४ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसज्ज व प्रशस्त शिक्षण वातावरण मिळणार आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिनांक २९ मार्च २०२६ रोजीच्या अधिकृत आदेशानुसार, प्राथमिक शाळांच्या इमारती बांधकामासाठी उपलब्ध निधीतून आढळगाव शाळेसाठी दोन वर्गखोल्या उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. या योजनेसाठी एकूण २५ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातूनच हे काम मंजूर झाले आहे. मात्र, शासनाच्या नियमांनुसारच खर्च करणे बंधनकारक राहणार असून मंजूर रकमेपेक्षा अधिक खर्चास सक्त मनाई करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कंत्राटदारास देयके अदा केली जाणार आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संयुक्त स्वाक्षरीनंतरच अंतिम देयक मंजूर होईल. या महत्त्वाच्या कामात सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधा ठवाळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, पंचायत समिती सभापती विलासराव भैलुमे, अंबादास चव्हाण, हनुमंत डोके, डॉ. डाळिंबे, निलेश डाळिंबे, सचिन शिंदे तसेच मुख्याध्यापक संतोष शिंदे यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या मंजुरीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.शिक्षणाच्या उन्नतीसाठी टाकलेले हे पाऊल भविष्यातील पिढीसाठी नक्कीच मोलाचे ठरणार आहे.

सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! हुंड्यासाठी छळ अन् विहिरीत उडी घेऊन शेवट
आई ही प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला गुरु : ऍड. देशपांडे ; ‘स्वाभिमानी माऊली’ पुरस्कारांनी आठ आदर्श मातांचा गौरव
कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी 47 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासाला गती मिळाली असून, दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी तब्बल २४ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसज्ज व प्रशस्त शिक्षण वातावरण मिळणार आहे.

जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिनांक २९ मार्च २०२६ रोजीच्या अधिकृत आदेशानुसार, प्राथमिक शाळांच्या इमारती बांधकामासाठी उपलब्ध निधीतून आढळगाव शाळेसाठी दोन वर्गखोल्या उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.

या योजनेसाठी एकूण २५ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातूनच हे काम मंजूर झाले आहे. मात्र, शासनाच्या नियमांनुसारच खर्च करणे बंधनकारक राहणार असून मंजूर रकमेपेक्षा अधिक खर्चास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कंत्राटदारास देयके अदा केली जाणार आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संयुक्त स्वाक्षरीनंतरच अंतिम देयक मंजूर होईल.

या महत्त्वाच्या कामात सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधा ठवाळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, पंचायत समिती सभापती विलासराव भैलुमे, अंबादास चव्हाण, हनुमंत डोके, डॉ. डाळिंबे, निलेश डाळिंबे, सचिन शिंदे तसेच मुख्याध्यापक संतोष शिंदे यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

या मंजुरीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.शिक्षणाच्या उन्नतीसाठी टाकलेले हे पाऊल भविष्यातील पिढीसाठी नक्कीच मोलाचे ठरणार आहे.

COMMENTS