Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थी एक चांगले नागरिक म्हणून घडले पाहिजे : डॉ सुकेश झंवर

बुलडाणा प्रतिनीधी -  येथील अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने शनिवारी इयत्ता दहावी, बारावी, निट, एमपीएससी, यूपीएससी, व सामाजिक क्षेत्र

चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक
फटाक्याचा फटका बसल्याने एका 11 वर्षाच्या मुलाची दृष्टी गेली
कर्जत ’महसूल’चा भोंगळ कारभार ?

बुलडाणा प्रतिनीधी –  येथील अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने शनिवारी इयत्ता दहावी, बारावी, निट, एमपीएससी, यूपीएससी, व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा  सत्कार समारंभ बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब मलकापूर रोड बुलडाणा येथे पार पडला, या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुकेशजी झंवर होते ते बोलतांना म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आज आपला सत्कार होत आहे, हेच गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्वल भविष्य आहे म्हणून या विद्यार्थ्यानी एक चांगले नागरिक म्हणून घडले पाहिजे असे डॉ. सुकेश झंवर म्हणाले, कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जेष्ठ विचारवंत दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ अशोक सोनवणे, डॉ दिपक काटकर, डॉ दुर्गासींग जाधव, इंजि.डी टी शिपणे,लक्ष्मण घुमरे, प्रकाश डोंगरे,यांचे मार्गदर्शन लाभले. 

 विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद  सदोदीत कसोशीने प्रयत्न करत असते याच बरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून परिसरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे काम वर्षभर सुरु असते. या कार्यक्रमाला, बहुजन शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब कांबळे, जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, डॉ जितेंद्र ओव्हाळ,वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश शीपे, अशोक पसरटे,के. एम. वैरी, भास्कर चंदोरे, मानसिंग पुर्भे यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रास्ताविक इंजि.डी.टी.शिपने, सूत्रसंचलन रोहित म्हस्के,आभार मुख्य आयोजक पुरूषोत्तम बोर्डे यांनी मानले, यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम बोर्डे,शरद खरात,ॲड.गुणवंत नाटेकर, ॲड. प्रविण सुरडकर,डॉ बबन परमेश्वर,कैलाश उतपूरे, प्रमोद माळी, भिमसिंग शिंगणे आदींनी परिश्रम घेतले,

COMMENTS