Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ

शेवगाव : अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अन्नभेसळीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात बुधवारी सायंकाळी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत मोची गल्लीतील ‘लकी दूध डेरी’ येथून दुधाचे व पनीर चे नमुने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरातील दूध व खवा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी दुकाने तातडीने बंद केली. अहिल्यानगर येथील जिल्हा अन्नभेसळ सहआयुक्त अपर्णा भोईटे व निरीक्षक प्रदीप पवार यांच्या पथकाने मंगळवार दि ०७ रोजी सायंकाळी अचानक छापेमारी करत संशयित ठिकाणांची तपासणी केली. यावेळी दुधाचे व पनीर चे नमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. अलीकडील काळात शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रकार वाढत असल्याने अन्न प्रशासनाने ही कारवाई अधिक तीव्र केली आहे. कारवाई दरम्यान शहरातील काही पेढे विक्रेते व मावा व्यावसायिकांनी संशयाच्या भीतीने दुकाने बंद केल्याचे दिसून आले. बंदी असलेले ब्रँडेड पॅकिंग मावा, गुटखा तसेच इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात नव्याने तीन सहसंचालक व नऊ अन्नभेसळ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, भविष्यात अशा धडक कारवाया सुरूच राहणार आहेत. नागरिकांनीही अन्न भेसळीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  दरम्यान, सामाजिक स्तरावरही अन्नभेसळ विरोधात आवाज उठू लागला असून, ग्रामीण भागात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे. अन्नात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  शिवाजी चौकामध्ये डेअरी सोडून छोटे विक्रेतेही  भेसळ करतात अशी चर्चा आहे, या छोट्या विक्रेत्यावरही कारवाई होणार का ? तसेच शेवगाव मध्ये अधिक कारवाया होणे अपेक्षित आहे तरच हा भेसळयुक्त दुधाचा पुरवठा बंद होईल अशी नागरिकात चर्चा आहे संबंधित डेअरीतून बाराशे लिटर दुधाची दररोज विक्री यावेळी अन्न व भेसळ प्रशासन अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले की संबंधित डेअरीतून दररोज १२,०० लिटर दूध विकले जात आहे. त्याचा जर हिशोब केला तर बाराशे गुणिले ऐंशी याचा हिशोब केला तर दररोज ९६ हजार रुपयांचे दूध एका दूध डेअरी मधून विकले जात आहे. याबाबत शेवगावकर नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुधावरील साईचे गुढ? दुधाच्या वर येणारी साई याबाबत सर्व नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. संबंधित दुधावर बोटभर साई येते इतकी मोठी साई इतरत्र कोणत्याही दूध डेअरी च्या दुधा मधून येत नाही. अन्न व प्रशासन विभाग या दुधावर येणाऱ्या साईचे गुढ उलगडून नागरिकांमध्ये जी उलट सुलट चर्चा आहे त्या शंकेचे निराकारण करेल का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त विक्रेत्यांत खळबळ
राज्यभरात एफडीएची (FDA) धडक मोहीम; ७३ लाखांचा औषध साठा जप्त, आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त

शेवगाव : अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अन्नभेसळीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात बुधवारी सायंकाळी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत मोची गल्लीतील ‘लकी दूध डेरी’ येथून दुधाचे व पनीर चे नमुने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरातील दूध व खवा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी दुकाने तातडीने बंद केली.

अहिल्यानगर येथील जिल्हा अन्नभेसळ सहआयुक्त अपर्णा भोईटे व निरीक्षक प्रदीप पवार यांच्या पथकाने मंगळवार दि ०७ रोजी सायंकाळी अचानक छापेमारी करत संशयित ठिकाणांची तपासणी केली. यावेळी दुधाचे व पनीर चे नमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. अलीकडील काळात शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रकार वाढत असल्याने अन्न प्रशासनाने ही कारवाई अधिक तीव्र केली आहे.

कारवाई दरम्यान शहरातील काही पेढे विक्रेते व मावा व्यावसायिकांनी संशयाच्या भीतीने दुकाने बंद केल्याचे दिसून आले. बंदी असलेले ब्रँडेड पॅकिंग मावा, गुटखा तसेच इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात नव्याने तीन सहसंचालक व नऊ अन्नभेसळ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, भविष्यात अशा धडक कारवाया सुरूच राहणार आहेत. नागरिकांनीही अन्न भेसळीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 दरम्यान, सामाजिक स्तरावरही अन्नभेसळ विरोधात आवाज उठू लागला असून, ग्रामीण भागात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे. अन्नात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 शिवाजी चौकामध्ये डेअरी सोडून छोटे विक्रेतेही  भेसळ करतात अशी चर्चा आहे, या छोट्या विक्रेत्यावरही कारवाई होणार का ? तसेच शेवगाव मध्ये अधिक कारवाया होणे अपेक्षित आहे तरच हा भेसळयुक्त दुधाचा पुरवठा बंद होईल अशी नागरिकात चर्चा आहे

संबंधित डेअरीतून बाराशे लिटर दुधाची दररोज विक्री

यावेळी अन्न व भेसळ प्रशासन अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले की संबंधित डेअरीतून दररोज १२,०० लिटर दूध विकले जात आहे. त्याचा जर हिशोब केला तर बाराशे गुणिले ऐंशी याचा हिशोब केला तर दररोज ९६ हजार रुपयांचे दूध एका दूध डेअरी मधून विकले जात आहे. याबाबत शेवगावकर नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुधावरील साईचे गुढ?

दुधाच्या वर येणारी साई याबाबत सर्व नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. संबंधित दुधावर बोटभर साई येते इतकी मोठी साई इतरत्र कोणत्याही दूध डेअरी च्या दुधा मधून येत नाही. अन्न व प्रशासन विभाग या दुधावर येणाऱ्या साईचे गुढ उलगडून नागरिकांमध्ये जी उलट सुलट चर्चा आहे त्या शंकेचे निराकारण करेल का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

COMMENTS