Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग लाइव्ह पाहता येणार

नवी दिल्ली प्रतिनिधी -  भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारता

मिठाच्या कणापेक्षाही छोटी बॅग
तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा

नवी दिल्ली प्रतिनिधी –  भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोची महत्वकाक्षी चांद्रयान- 3 मोहीमेबाबत सतत महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. भारताच्या चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासोबतच लँडर त्याची नवीन छायाचित्रेही घेत आहे. अशामध्ये येत्या २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम इतिहास रचण्यापासून अगदी काही पावले दूर आहे. चांद्रयानचे विक्रम लँडर चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासोबतच त्याची नवीन छायाचित्रे घेत आहे. इस्रोने लँडरने काढलेली अनेक नवीन छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. विक्रम लँडर मॉड्युल येत्या बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. चांद्रयान 3 चं चंद्रावरील लँडिंग भारतीयांना लाईव्ह पाहता येणार आहे. या दिवसाची सर्वच भारतीयांना खूपच उत्सुकता आहे.

लँडिंग लाईव्ह पाहू शकता- चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंगसाठी पाहण्याासाठी प्रत्येक भारतीय खूपच उत्सुक असून या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत आहे. चांद्रयान ३ चे लँडिंग पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चांद्रयान ३ चे लँडिंग लाईव्ह पाहण्यासाठी ISRO ने प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करुन दिला आहे.

  ISRO ची वेबसाइट https://isro.gov.in वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

YouTube चॅनेल https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

फेसबुक पेज https://facebook.com/ISRO वर लाईव्ह लँडिंग पाहू शकता.

DD नॅशनल टीव्ही स्ट्रीमिंगवर देखील तुम्ही लाईव्ह लँडिंग थेट पाहू शकतात.

COMMENTS