Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

इराण तात्काळ सोडून भारतात परत या !युद्धविरामनंतर मायदेशी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती अद्याप पूर्णपणे निवळलेली नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये राहणार्‍या भारतीय नाग

अमेरिका-इराणची पुढील चर्चा जिनिव्हात होण्याची शक्यता
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प थोडक्यात बचावले; अमेरिकेतील व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनरदरम्यान गोळीबार
अमेरिका-इराण चर्चेला पुन्हा खीळ; अधिकार्‍यांनी पाकिस्तान दौरा केला रद्द

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती अद्याप पूर्णपणे निवळलेली नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये राहणार्‍या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. तेथील सर्व नागरिकांनी शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षित मार्गांचा अवलंब करून देश सोडावा, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
इराणमधील भारतीय दूतावासाने बुधवारी जारी केलेल्या सूचनेत नागरिकांनी प्रवास करताना केवळ अधिकृत व सुरक्षित मार्गांचा वापर करावा, असे नमूद केले आहे. दूतावासाशी सतत संपर्कात राहणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. परवानगी किंवा समन्वयाशिवाय कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ई-पत्रव्यवहाराची साधने उपलब्ध करून दिली आहेत, जेणेकरून गरजेच्या वेळी त्वरित सहाय्य मिळू शकेल. यापूर्वी मंगळवारी नागरिकांना जिथे आहेत तिथेच पुढील 48 तास सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्या वेळी संभाव्य हल्ल्यांच्या भीतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर होती.
अधिकृत माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी संघर्षाला सुरुवात झाली तेव्हा इराणमध्ये सुमारे नऊ हजार भारतीय होते. यामध्ये विद्यार्थी, कामगार आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा समावेश होता. आतापर्यंत सुमारे एक हजार आठशे नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले असून उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरती शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली असली, तरी परिस्थिती पूर्णपणे स्थिर झालेली नाही. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता नागरिकांची सुरक्षितता प्रथम मानण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान, या संघर्षाची ठिणगी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर पडली होती. त्यानंतर संपूर्ण प्रदेशात तणाव कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत सूचनांवरच विश्‍वास ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

युद्धविरामाचे भारताकडून स्वागत
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे भारताने स्वागत करताना, या निर्णयामुळे पश्‍चिम आशियात तणाव कमी होऊन शांततेचा मार्ग खुला होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर हा युद्धविराम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्धविराम हा केवळ तात्पुरता दिलासा नसून, तो दीर्घकालीन तोडग्याकडे नेणारा मार्ग ठरावा. संघर्ष थांबवण्यासाठी परस्पर संवाद, संयम आणि कूटनीती यांनाच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही भारताने सातत्याने तणाव कमी करण्यावर भर दिला होता. या संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसल्याचेही भारताने नमूद केले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याचबरोबर या परिस्थितीचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार व्यवस्थेवरही झाला आहे.

COMMENTS